आरोग्य विभाग अर्लटवर, कोरोनाची रुग्णसंख्या सातशेपार

170

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी एकाच दिवसात राज्यात कोरोना रुग्णाची संख्या ७११ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतच 506 रुग्ण सापडल्याने मुंबईचा आरोग्य विभाग आता कामाला लागला आहे.

त्याखालोखाल ठाण्यात २० तर पुण्यात एकाच दिवसात ४५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण दर तीन-चार दिवसांनी खाली येत आता ९८.०८ टक्क्यांवर आले आहे.

(हेही वाचाः राज्यात दिवसभरात ४३१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद)

अशी आहे परिस्थिती

नव्या रुग्ण नोंदीच्या तुलनेत रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी नोंदवले गेले. राज्याच्या विविध भागांतील केवळ ३६६ रुग्णांना कोरोना उपचारांतून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज दिला गेला. वाढत्या रुग्ण संख्येत मुंबईत आता २ हजार ५२६ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा तीनशेजवळ येऊन पोहोचली आहे. पुण्यात आता २९७ कोरोना रुग्ण आहेत. ठाण्यातील कोरोना रुग्णांची थेट ४००हून अधिक नोंद झाली आहे. ठाण्यात आता ४१३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३ हजार ४७५ पर्यंत नोंदवली गेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.