Health Department Guidelines : झिकाचा संसर्ग वाढला जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी

129
Health Department Guidelines : झिकाचा संसर्ग वाढला जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी
Health Department Guidelines : झिकाचा संसर्ग वाढला जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी

ऑक्टोबरपासून राज्यामध्ये झिकाचे पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Health Department Guidelines)

इचलकरंजीमध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत, तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शेजारील कर्नाटकमध्येही या आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुण्यात एक रुग्ण; उपाययोजना सुरू
शहरात झिका आजाराचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये सापडला असून आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तपासणीत झिकाचे निदान झाले.दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

यामुळे झिकाचा प्रसार
झिका विषाणू हा फलॅव्हिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास दिवसा चावतो. हा डास डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप पसरवतो.

(हेही वाचा : America : वार्षिक ३ कोटी वेतन तरीही अमेरिकेत डॉक्‍टरांची चणचण)

ही आहेत लक्षणं
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने लैंगिक संबंध, गर्भाद्वारे संक्रमण, रक्त आणि प्रत्यारोपणाद्वारे, गर्भधारणेदरम्यान, आईपासून रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारपणाद्वारे होतो. झिकाची चिन्हे व लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिकाची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यूसारखी असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिकाचे निदान व उपचार नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. (Health Department Guidelines)

अशी घ्या काळजी

झिका रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही झिकाचे लक्षण असलेले रुग्ण आल्यास त्यांचा नमुना सरकारी यंत्रणेमार्फत पुण्यातील एनआयव्ही येथे तपासून घ्यावा.

डेंग्यू आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त २ ते ८ अंश तापमानात शीतशृंखला अबाधित ठेवूनन तपासणीसाठी पाठवावे. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे. अशी माहितीही आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.