प्रशासकीय अधिका-यांची आपल्या विभागावर चांगलीच जरब असते. असेच एक प्रशासकीय अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. ते आपल्या कर्तव्यनिष्ठतेसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. मुंढे यांची राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अलिकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आरोग्य विभागात घेतलेल्या निर्णयांमुळे डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला आहे.
तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय अधिका-यांसाठी एक अनोखा फतवा काढला असून, आता डॉक्टरांसह वैद्यकीय अधिका-यांनाही बायोमेट्रिक हजेरीच्या नुसारच त्यांना त्यांचे वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्त मुंढे यांचा फतवा
शासकीय रुग्णालयांत नेमणूक झालेले डॉक्टर खासगी रुग्णालयात देखील सेवा देत असतात. त्यामुळे हे करत असताना शासकीय रुग्णालयांत उशिरा येणे किंवा सुट्टी घेऊन हजेरी पटावर हजर असल्याचा शेरा मारणे असे प्रकार करण्यात येतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बायोमेट्रिक हजेरीनुसार, डॉक्टर व वैद्यकीय अधिका-यांना वेतन आणि भत्ते देण्याचा फतवा काढला आहे.
नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होणार
त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कार्यरत असणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिका-यांची नावे, खासगी रुग्णालयांची नोंद, अशा वैद्यकीय अधिका-यांची तपशीलवार माहितीसह यादी सदर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.तसेच ही पद्धत अंमलात न आणल्यास अशा अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे दांडीबहाद्दर आणि बेजबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांवर चांगलाच चाप बसणार आहे.
Join Our WhatsApp Community