राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरुवात झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणाऱ्या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक शुक्रवारी, २६ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहे. १५ आणि १६ ऑक्टोबरला गट क या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. पुढच्या १५ दिवसांत त्यासंबंधी निकाल लावणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची गट क, गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी केली जाईल. यासंबंधी नियुक्तांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मार्च २०१९ च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाईल. दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचे समोर आले. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती.
(हेही वाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची सलगी!)
Join Our WhatsApp Community