आता राज्यात राबवलं जाणार ‘मिशन कवच कुंडल’! काय आहे योजना? वाचा

राज्यातील जास्तीत-जास्त लोकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे ध्येय्य आहे.

109

लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका अजून टळलेला नाही. १५ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्यापर्यंत देशात १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ या योजनेची घोषणा केली आहे.

काय आहे योजना?

मिशन कवच कुंडल योजना ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबवली जाणार आहे. राज्यात ७५ लाख लसींचा साठी उपलब्ध आहे. तर 25 लाख लसींचा साठी लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोज किमान १५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सहा दिवसांत लसींच्या या साठ्याचे नागरिकांना वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. अहमदगरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे, त्यामुळे नगर जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन लसीकरण वाढवावे असेही आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः आता गॅस सिलेंडर पुन्हा महागले! इतक्या रुपयांनी वाढले दर)

लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यावर भर

राज्यात शिथिलकरण करत आता संपूर्ण राज्य 100 टक्के अनलॉक करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. पण त्यासाठी राज्यातील रुग्णसंख्या कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत-जास्त लोकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे ध्येय्य आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ दिवशी विजांच्या कडकडाटासह कोसळणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.