आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांची वरळीच्या कामगार विमा रुग्णालयाला अचानक भेट

30
आरोग्यमंत्री Prakash Abitkar यांची वरळीच्या कामगार विमा रुग्णालयाला अचानक भेट
  • प्रतिनिधी

राज्यातील कामगारांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी शुक्रवारी वरळी येथील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाची अचानक पाहणी केली. राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या रुग्णालयाच्या सेवा-सुविधांची मंत्री आबिटकर यांनी तपशीलवार पाहणी केली आणि सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

वरळीतील हे रुग्णालय मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असूनही कामगारांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्री आबिटकर (Prakash Abitkar) यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून सुविधांची स्थिती जाणून घेतली. रूग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Sri Ganesh Gaurav Competition-2024 पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटात आणि उत्साहात पार पडला)

कामगारांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा निर्धार

राज्यातील कामगारांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कामगार विमा महामंडळाद्वारे ईएसआयसी (ESIC) रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी सेवांबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आजच्या पाहणीदरम्यान, मंत्री आबिटकर (Prakash Abitkar) यांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्यांचे मूळ ओळखण्याचा प्रयत्न केला.

आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

पाहणीनंतर मंत्री आबिटकर (Prakash Abitkar) यांनी अधिकाऱ्यांना रूग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधा लवकरात लवकर पुरवण्याचे आदेश दिले. तसेच, रूग्णसेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचेही निर्देश त्यांनी दिले. कामगारांसाठी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले.

या दौऱ्यामुळे कामगार विमा रूग्णालयातील सेवांमध्ये लवकरच सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.