राज्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून सुरु करण्यास काही अडचण नाही, कारण या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाणे आणि मृत्यूचे प्रमाण फारसे नाही. त्यामुळे पालकांनी याबाबत निश्चिंत राहावे. मात्र यावर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री हेच घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
१२-१८ वयोगटासाठी लसीकरण गरजेचे
दरम्यान १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची गरज आहे, कारण या वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग गंभीर स्वरूपाचा नसला तरी ते सर्वत्र फिरत असतात, त्यामुळे ते घरातील वयस्क आणि सहव्याधींना संसर्ग देऊ शकतात. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्याची परवानगी केंद्राने द्यावी. कोवॅक्सीन ही लस देण्यात हरकत नाही, केंद्राने परवानगी दिल्यास लसीकरणाची सर्व तयारी राज्य सरकारची पूर्ण झाली आहे, असेही मंत्री टोपे म्हणाले.
(हेही वाचा एसटीबाबत महत्वाच्या बैठकीआधी आझाद मैदानात रंगले नाराजी नाट्य)
कोरोना कमी मात्र गाफील राहू नका
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, म्हणून कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याबाबत ढिलाई करणे चुकीचे आहे. कारण जपान, जर्मनी, ऑस्ट्रोलिया या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. रुग्णालये कमी पडत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असेही मंत्री टोपे म्हणाले.
राज्यात १० कोटी लसींचे डोस दिले
राज्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे. ४० टक्के नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. तसेच एकूण १० कोटी ८४ लाख लसीचे डोस देण्यात आले आहे. सध्या परदेशात डेल्टा व्हेरियंटने थैमान घातले आहे. त्यावर भारतातील लसी प्रभावी ठरत आहेत. म्हणून या डेल्टा व्हेरियंटचा महाराष्ट्रात तितका परिणाम होताना दिसत नाही
Join Our WhatsApp Community