कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

138

राज्यात 1 एप्रिलपासून कोविडचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य आता कोविडमुक्तीकडे वाटचाल करत असतानाच आता कोविडच्या दोन नव्या विषाणूंचा राज्यात शिरकाव झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील निर्बंध कडक करण्यात येणार का, अशी चिंता आता वर्तवण्यात येत आहे. याचबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. नव्या विषाणूबाबत कुठलीही अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले टोपे?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि संसर्गजन्य रोगांची माहिती देणा-या कस्तुरबा गांधी प्रयोगशाळेकडून या नव्या विषाणूंबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या विषाणूंबाबत त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच याबाबत योग्य त्या सूचना देण्यात येतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

(हहेी वाचाः सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर औषधापुरतेच: गर्भवती तसेच मुलांचे हाल!)

मुंबईत २२८ ओमायक्रॉनबाधित रुग्ण

कापा आणि एक्सई हे नवे दोन विषाणू मुंबईतील दोन रुग्णांमध्ये आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. ही माहिती कोरोना विषाणूंच्या नमुन्यांच्या (जनुकीय अहवाल) ११व्या अहवालातून पालिकेने प्रसिद्ध केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. या अकराव्या अहवालात २३० नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात २२८ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले. ओमायक्रोन विषाणूचे ९९.१३ टक्के रुग्ण होते.

कोविड विषाणू उपप्रकारानुसार २३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण

• ओमायक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)
• कापा व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)
• एक्सई व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)

(हेही वाचाः मुंबईत कोरोनाचे दोन नवे विषाणू …)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.