Health Policy : देशातील उपचार खर्चाचे भीषण वास्तव उघडकीस; आता विमाधारकांनाही सोसवेना उपचार खर्च

150
Health Policy : देशातील उपचार खर्चाचे भीषण वास्तव उघडकीस; आता विमाधारकांनाही सोसवेना उपचार खर्च
Health Policy : देशातील उपचार खर्चाचे भीषण वास्तव उघडकीस; आता विमाधारकांनाही सोसवेना उपचार खर्च

Health Policy : आरोग्य विमा असलेल्या व्यक्तींनाही आरोग्याचा खर्च सोसवत नाही. या व्यक्ती अनेकदा डॉक्टरांकडे जाणे टाळत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. हेल्थकेअर फर्म गोकीच्या इंडिया फिट रिपोर्ट-२०२५ (India Fit Report-2025) मध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ६० लाख वापरकर्त्यांची संकलित केलेली माहिती आणि दोन हजार व्यक्तींशी संवाद साधून कंपनीने हा अहवाल तयार केला आहे. (Health Policy)

भारतामध्ये आरोग्य उपचार आवश्यक सेवा न राहता ती एक चैनीची वस्तू झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. पुण्यात एका गर्भवती महिलेने तातडीने पैसे न भरल्याने रुग्णालयाने उपचारास विलंब केला. त्यामुळे महिलेचा जीव गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. यातील उपचारांचा खर्च वीस लाख रुपयांच्या घरात होता. आरोग्य विमा असलेल्या व्यक्तींनाही आरोग्याचा खर्च सोसवत नाही. या व्यक्ती अनेकदा डॉक्टरांकडे जाणे टाळत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पाचपैकी एका व्यक्तीने आवश्यक उपचारांसाठी देखील डॉक्टरांकडे जाणे टाळण्यावर भर असल्याचे सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे होणारा प्रचंड खर्च हेच आहे, तर ७१ टक्के व्यक्तींनी वैद्यकीय उपचारांचे खर्च गगनाला भिडल्याचे सांगितले. वैद्यकीय विमा असलेल्या व्यक्तींनी देखील डॉक्टरांचा खर्च परवडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळत असल्याचे ३६ टक्के जणांनी सांगितले.

(हेही वाचा – Crime : संपत्तीच्या वादातून वांद्र्यात एका कुटुंबावर हल्ला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, चार जणांना अटक)

गोकीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल (Vashal Gondal) म्हणाले की, आरोग्य (Health) उपचारांचा खर्च वाढत आहे. ही केवळ आकडेवारी नाही. देशातील कुटुंबांवर कोसळलेली आणीबाणी आहे. आरोग्य हा नागरिकांचा अधिकार आहे. तो विशेषाधिकार नाही, याची जाणीव ठेवून नियम तयार करायला हवेत. तसेच बदलती जीवनशैली, आहारात हानिकारक पदार्थांचा समावेश, व्यायामाचा आभाव, यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढत आहे.

अहवालातील ठळक नोंदी काय ?
– ७१ टक्के जणांनी वैद्यकीय उपचार खर्च हाताबाहेर गेल्याचे मत नोंदविले
– आपत्कालीन खर्च करणे अवघड
– विमा असूनही खर्च परवडत नसल्याचे ३६ टक्के व्यक्तींचे मत
– रास्त दरात वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे ६० टक्के व्यक्तींनी सांगितले.

(हेही वाचा – Conversion : शाळेसाठी उपलब्ध केलेल्या जमिनीवर मिशनरी बांधत होती चर्च; धर्मांतरणाचा डाव, गावकरी आक्रमक )

आरोग्य विम्यावर अविश्वास…
विमा कंपन्यांचे (Insurance company) दावा नाकारण्याचे अधिक प्रमाण, विमासंरक्षण रक्कमेची अपुरी मर्यादा, तसेच विमासंरक्षणात अस्पष्टतेमुळे विमा नाकारला जाणे, यामुळे आरोग्य विम्यावरील अविश्वास वाढत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

आरोग्य विमा म्हणजे काय?
आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) ही वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी आर्थिक मदत करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यातील करार असून यामध्ये आजारपण, दुखापत किंवा अपघातामुळे होणारे वैद्यकीय खर्च याची भरपाई मिळते. जे पॉलिसीधारक नियमित प्रीमियम भरतात आणि त्या बदल्यात, विमा योजना हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, औषधे आणि प्रतिबंधात्मक काळजी यासह विविध वैद्यकीय सेवा भरपाई मिळू शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.