Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

121
Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी
Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत स्वच्छता ही दैनंदिन सवय व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. (Navi Mumbai)

(हेही वाचा- Crime News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत पोलिसांनी लावला छडा)

नवी मुंबईच्या स्वच्छतेमधील मानांकनात दररोज शहर स्वच्छ ठेवणा-या स्वच्छतामित्रांच्या व स्वच्छतासखींच्या कामाचा सर्वात महत्वाचा वाटा असून शहराच्या स्वच्‍छतेची पर्यायाने आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची नवी मुंबई महानगरपालिका जागरुकतेने काळजी घेत आहे. (Navi Mumbai)

या अनुषंगाने स्वच्‍छता ही सेवा पंधरवड्यात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत तंबाखूमुक्त जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. (Navi Mumbai)

(हेही वाचा- देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणता येणार नाही; Supreme Court चे कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाला खडे बोल)

त्याच ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ उपक्रमांतर्गत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये तसेच 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र याठिकाणी स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 3500 हजारहून अधिक स्वच्छतामित्र आणि स्वचछतासखींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. (Navi Mumbai)

मुख्यालयातील शिबीराच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त्‍ सुनिल पवार यांनी वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व संतोष वारूळे, सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्यासह भेट देत पाहणी केली. (Navi Mumbai)

(हेही वाचा- World Environment Health Day : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन का साजरा केला जातो?)

या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये डोळे, नाक कान घसा, दंत व मुख तपासणी करण्यात आली तसेच रक्तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तचाचणी घेण्यात येऊन तपासणी करण्यात आली. तपासणीच्या निदानानुसार आवश्यक त्या स्वच्छताकर्मीचा इसीजी काढण्यात आला. यावेळी मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी 30 बाटली रक्त संकलीत करण्यात आले. (Navi Mumbai)

मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयातील 10 डॉक्टर्स, 20 पॅरामेडिकल स्टाफ व 10 मदतनीस यांनी आरोग्य तपासणी व चाचणी कार्यवाही केली. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या परिसरातील स्वच्छता मित्र व स्वच्छता सखींची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणीत पुढील उपचार आवश्यक असल्याचे आढळलेल्या स्वच्छताकर्मींवर महापालिका रुग्णालयामध्ये पुढील उपचार मोफत केले जाणार आहेत. यावेळी आभा कार्ड नोंदणीही करण्यात आली.  (Navi Mumbai)

(हेही वाचा- PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द)

स्वच्छता ही सेवा मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या विशेष आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतलेल्या स्वच्छताकर्मींनी समाधान व्यक्त केले. (Navi Mumbai)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.