मानवी शरीर जिवंत राहण्यासाठी शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते. श्वास घेताना अनेक वायू फुफ्फुसात पोहोचतात. (Health Tips) फुफ्फुसे शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन देतात, मात्र हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही सोपे उपाय कसे करावेत, जाणून घ्या –
– धूम्रपानामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात. त्यामुळे फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी धूम्रपान करू नये. शिवाय आहारात लसणाचा समावेश करा. लसणामध्ये (Garlic) अँण्टीऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्म असतात. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे फुफ्फुसांचे कार्य योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते.
– पालकामध्ये बीटा कॅरोटीन, क्लोरोफिल, झेक्सॅन्थिन आणि ल्युटिन (carotene, chlorophyll, zeaxanthin and lutein) असते. त्यामध्ये क्लोरोफिलसारखे अँण्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात.
(हेही वाचा – Suspected ISIS Terrorist : बक्षिस जाहिर करण्यात आलेल्या दहशतवाद्याला अटक )
– आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका टाळता येतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे तत्त्व असते. ते फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते. यामुळे दम्याचा धोका टळतो.
– हळद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी आहारात हळदीचा समावेश करावा. याशिवाय अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीची मदत होते.
हेही पहा –