जुलै अखेरीस राज्यात कॉलराचे अजून दोन बळी गेल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालत उघडकीस आले परंतु जुलै अखेरीस कॉलरामुळे अमरावती जिल्ह्यात दोन बळी गेले की राज्याच्या इतर भागात याबाबत माहिती मिळू शकली नाही. अतिसारामुळेही एक रुग्ण मरण पावला. राज्यात आतापर्यंत जलजन्य आजारामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, गेल्या चार वर्षांतील ही उच्चाकी नोंद आहे. कॉलरा आणि अतिसाराचे रुग्णही गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त दिसून आलेत.
राज्यात गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात कॉलराचा उद्रेक झाला होता. एकट्या अमरावती जिल्ह्यात कॉलरा पसरताच पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर अजून दोन रुग्ण दगावले. जुलै महिन्यात कॉलराने 7 जणांचा बळी घेतला. अतिसारामुळे राज्यातील कोणत्या भागात रुग्ण दगावला याबाबत आरोग्य विभागाने माहिती दिली नाही.
इतर सर्व जलजन्य आजारात कॉलरा आणि अतिसारामुळेच यंदाच्या वर्षात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात अतिसाराच्या रुग्णांची संख्या प्रामुख्याने नोंदवली जात आहे. अतिसाराचे राज्यात आतापर्यंत 1 हजार 269 रुग्ण नोंदवले गेले आहे. कॉलरा, गेस्ट्रॉ, कावीळ या जलजन्य आजरांच्या तुलनेत अतिसाराचे रुग्ण जास्त नोंदवले जात आहेत. त्याखालोखाल 300 रुग्णांना आतापर्यंत कॉलराची लागण झाली आहे.
- रोगाचे नाव – लागण – मृत्यू
- कॉलरा – 300 – 7
- गेस्ट्रॉ – 19 – 0
- अतिसार – 1 हजार 269 – 1
- कावीळ – 34 – 0
- एकूण – 1 हजार 622 – 8
गेल्या चार वर्षांतील जलजन्य आजरांच्या रुग्णांची संख्या
- वर्ष – रुग्णांची संख्या – मृत्यू
- 2019 – 2 हजार 200 – 3
- 2020 – 1 हजार 174 – 0
- 2021 – 1 हजार 622 – 0
- 2022 – 1 हजार 622 – 8