पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात टाकेविरहित वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयात टाके विरहित वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया १८ ते २० लाखांमध्ये केली जाते. मात्र केईएम रुग्णालयात टाके विरहित वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहे.
आरोग्य संदर्भात गुंतागुंत असलेल्या रुग्णांसाठी इंडियन वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. केईएम रुग्णालयात हीच शस्त्रक्रिया दहा लाखांच्या आत उपलब्ध आहे. या शस्त्रक्रियेचे दर दहा लाखांपेक्षाही कमी होऊ शकतात. केईएम रुग्णालयातील हृदयरोग विभागाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारा वॉल कर भावा पेक्षाही केईएम रुग्णालयाला रास्त दरात उपलब्ध झाल्यास टाके विरहित वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केवळ सात लाखांमध्ये रुग्णांना उपलब्ध होऊ शकते.
(हेही वाचा – Seema Deo : जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली)
अभिनेत्री तृप्ती भोईर यांचे वडील विलास भोईर यांच्यावर केईएम रुग्णालयात नुकतीच टाके विरहित वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली गेली. विलास भोर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्यांना तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासांती त्यांना वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले. यास विलास भोर यांनी स्वतःहून खाजगी रुग्णालया ऐवजी केईएम मध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला.
सिटीस्कॅन आणि इतर आवश्यक तपासण्या केल्यानंतर केईएम रुग्णालयाच्या हृदयविकार विभागाचे प्रसिद्ध हृदयविकारतज्ञ डॉक्टर चरण लांजेवार यांनी तृप्ती भोईर यांच्या वडिलांवर टाके विरहित व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. रुग्णाचे वयमान लक्षात घेता त्यांना ओपन हार्ट शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक ठरत होते. यास भोईर यांना पायातून टाके विरहित एवोर्टिक वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. बाजारभावाच्या तुलनेत या शस्त्रक्रियेचा कमी दर पाहता गरजू रुग्णांनी ही शस्त्रक्रिया तातडीने करून घ्यावी असे आवाहन केईएम रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community