वाढत्या उष्म्याचा (Heat wave) पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून सुमारे १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा(Heat wave) त्रास झाला असून, दररोज साधारण १० पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी झाले आहेत. तसेच प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास होत आहे. (Heat wave)
(हेही वाचा –Heat wave: मुंबईकरांची काहिली; मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट)
वाढत्या तापमानामुळे या पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ते निपचित पडलेले पक्षीप्रेमी व स्वयंसेवकांना आढळले. यामध्ये ४० गाईंचा समावेश असून, काही श्वानांना निर्जलीकरणाचा त्रास झाला आहे. तर सुमारे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये २२ कबूतर, १६ कावळे, एक पोपट, दोन मैना, १७ घारींचा समावेश आहे. (Heat wave)
(हेही वाचा –Ayodhya Ram Temple: रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणारा सूर्याभिषेक आनंददायी!)
या पक्षी व प्राण्यांवर परळ येथील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल’ (बैलघोडा हॉस्पिटल) या रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Heat wave) पुढील काळामध्ये तापमान वाढल्यास याचा फटका पक्षी व प्राण्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी घराच्या छतावर, गच्चीवर पाण्याची व्यवस्था करावी. असे रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले. (Heat wave)
हे पहा –