Weather Update : उन्हाचा चटका वाढणार; ‘या’ राज्यांमधील उष्णतेची लाट तीव्र होणार

77
Weather Update : उन्हाचा चटका वाढणार; 'या' राज्यांमधील उष्णतेची लाट तीव्र होणार
Weather Update : उन्हाचा चटका वाढणार; 'या' राज्यांमधील उष्णतेची लाट तीव्र होणार

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच देशभरात तीव्र उष्णतेचा काळ सुरु झाला आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या आठवड्यात काही राज्यांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट दिसून येईल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD Updates) व्यक्त केला आहे. ( Weather Update)

( हेही वाचा : ‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट येईल. दि. ६ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान ईशान्येकडील अनेक राज्ये आणि डोंगराळ भागात पाऊस, गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. ( Weather Update )

महाराष्ट्रातील अनेक भागात कमाल तापमान वाढण्याची शक्यता

दरम्यान पुढील ४ दिवसांत वायव्य भारत, महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात कमाल तापमान २-४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य भारतातील अनेक भागात कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. पुढील २ दिवसांत गुजरातमधील कमाल तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतर, पुढील ३ दिवसांत तापमानात २-४ अंश सेल्सिअसची घट होणे अपेक्षित आहे. (Weather Update)

त्यातच गेल्या २४ तासांच्या हवामानाचा आढावा घेतला तर, गुजरात (Gujarat) राज्य आणि लगतच्या नैऋत्य राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहिली. याशिवाय, अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) , आसाम आणि मेघालय, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल, किनारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील यानम येथे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह वादळे आली. (Weather Update)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (India Meteorological Department) म्हटले आहे की, एका नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होऊ शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर-लडाख गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह तुरळक ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विखुरलेला ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.