देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट! तर अनेक भागात पावसाचा अंदाज

116

गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामान मोठा बदल होत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी करून शेतकऱ्यांसह नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनपेक्षित हवामान बदल दिसून येत आहेत.

( हेही वाचा : आरोग्य यंत्रणा सतर्क! एका दिवसात आढळले ४,४३५ कोरोना रुग्ण, १५ जणांचा मृत्यू )

येत्या काही दिवसात उष्णता वाढणार

भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णता वाढणार आहे. एप्रिलमध्येच मे महिन्याप्रमाणे उष्णता जाणवेल. ११ एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरच्या तापमानात ३ ते ५ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, तर राजस्थानमध्ये ८ एप्रिलपासून तापमान वाढण्यास सुरूवात होईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.