गेल्या दोन दिवसांपासून ब्रेकवर असलेली उष्णतेची लाट येत्या आठवड्यात पुन्हा सुरु होईल. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उष्णतेची लाट परतेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
दोन ते तीन अंशाने वाढ होणार
विदर्भासाह नजीकच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव राहील, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याच्यावतीने दिला गेला. सध्या विदर्भात 40 अंश सेल्सीयस पर्यंत कमाल तापमान नोंदवले जात आहे. हेच तापमान गेल्या आठवड्यात उष्णतेची लाट असताना, 43 ते 45 अंशापर्यंत गेले होते. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी भागातील कमाल तापामानाने जागतिक विक्रम नोंदवला होता. विदर्भात येत्या तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होईल.
( हेही वाचा: पट्टेरी वाघाला खुणावतेय राधानगरी )