Heat Wave : विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा इशारा

यंदा मान्सून पूर्व पाऊस न आल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण झाले आहे.

183
Heat Wave : विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा इशारा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सतत तापमानात (Heat Wave) बदल होत आहेत. अशातच मान्सून लांबल्याने अनेक भागांमध्ये उन्हाचे चटके जाणवत असून नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जूनचा दुसरा आठवडा सरला तरीही मान्सूनची अजूनही काहीच चिन्हे दिसत नसल्याने विदर्भातील तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशांनी वाढले आहे.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone : राजस्थानमध्ये १४ ट्रेन, २ विमान उड्डाण रद्द; ४ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा)

विदर्भातील (Heat Wave) गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

यंदा मान्सून पूर्व पाऊस न आल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण झाले आहे. अशा परिस्थितीत उष्माघात (Heat Wave) होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशातच नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे नागपूर हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला असून २० जून नंतर विदर्भात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.