यंदा उन्हाळा लवकर सुरु झाला असून कमाल तापमानाचा (Maharashtra Weather) पारा आतापासूनच 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत आहे. तीव्र तापमान (Temperature) बदलाची सुरुवात झाली असून तापमानात वारंवार चढउतार होत आहेत. केवळ तापमानच नाही तर दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा चटका जाणवत आहे. काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्यानं ढगाळ वातावरण आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-Ministry : मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता आणि पारदर्शकतेत वाढ
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांत किमान व कमाल तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(IMD Forecast) फेब्रुवारीपासून आता तापमानवाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. येत्या 3 दिवसांत किमान तापमानात 2-3 अंशांची वाढ होणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची चिन्हे आहेत. (Maharashtra Weather)
हेही वाचा-भारत AI युद्धात अमेरिका आणि चीनला हरवेल का?
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असून उकाडा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, येत्या 2 दिवसात 2-3 अंशांनी वाढ होऊन नंतर तापमान हळूहळू कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. येत्या 3 दिवसात विदर्भात फारसा बदल नसेल . पण त्यानंतर 2-3 अंशांनी घसरणार आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community