Heat Wave : राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

64
Heat Wave : राज्यातील 'या' ५ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

राज्यात होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. राज्यात सध्या प्रचंड उष्ण तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. ११ मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heat Wave)

(हेही वाचा – Women Health : मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त; धक्कादायक आकडेवारी समोर)

राज्यात येत्या पाच दिवसांत तापमानाचा उच्चांक वाढल्याचा पहायला मिळणार आहे. तापमानाचा पारा २-४ अंशांनी वाढणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी (९ मार्च) ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ११ मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे. (Heat Wave)

(हेही वाचा – Champions Trophy Final 2025 : न्यूझीलंडला दुसरा झटका ! विल यंग, रवींद्र बाद)

मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान चढेच असून गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाली आहे. नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरीपेक्षा खूप उष्ण ठरला. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान २७.५८ अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते २९.७ अंश सेल्सिअस राहिले आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअस नोंद झाली होती. बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे. (Heat Wave)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.