एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे.
राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळे, उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. (Heat waves)
(हेही वाचा – Heat waves : राज्यात तापमानाचा पारा वाढला)
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट (Heat Waves) पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा फटका अमळनेर येथील एका महिलेला बसला असून उष्माघाताने (Heat Waves) तिचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. रुपाली राजपूत असे या महिलेचे नाव आहे. रुपाली राजपूत या जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत.
हेही पहा –
रुपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. रेल्वेतून प्रवास करुन त्या भर उन्हात (Heat Waves) आपल्या घरी आल्या. परंतु काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्रास वाढताच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरकडून प्राथमिक उपचार करुन घेतले होते. त्यानंतर काही वेळासाठी त्यांना बरंही वाटू लागलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांना पुन्हा एकदा उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला आणि त्यांची शुद्ध हरपली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (Heat Waves)
Join Our WhatsApp Community