सध्या संपूर्ण राज्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. सोलापूरात सुद्धा तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून सोलापूरातील सिव्हिल रूग्णालयामध्ये २० खाटा असलेला स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. ही माहिती वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
उच्च तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत मिळावेत यासाठी ही व्यवस्था तयार करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले.
( हेही वाचा : महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय? )
उष्माघातावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग
सिव्हिल रूग्णालयामध्ये एकूण ७३३ हून अधिक बेड आहेत. नियमित ओपीडीत रूग्णसंख्या दीड ते दोन हजारांच्या दरम्यान असते. कोविड बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी सध्या इतर रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. यात सर्जरी, अर्थो, स्त्रीरोग, बालरोग, मेडिसीन आदी विभागात दाखल असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच आता मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात सोलापुरात ४२.६ अंश सेल्सिअश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघात किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येण्यासारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळे अशा गरजू रुग्णांना तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत. म्हणूनच उष्माघातावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला जात आहे, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.
Join Our WhatsApp Community