Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

शनिवारी दुपारी एमआयडीसी परिसरातील सुजान रासायनिक कारखान्यात आग लागली.

208
Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग
Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील एका रासायनिक कारखान्यात शनिवारी भीषण आग लागली. ही आग (Fire) इतकी भीषण होती की, परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. (Fire)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एमआयडीसी परिसरातील सुजान रासायनिक कारखान्यात आग लागली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही तसेच आग लागल्याचे कारण कळलेले नसून आगीत जखमी झालेल्या व्यक्तिंची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

(हेही वाचा –Pune Municipality: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारीला जाहीर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.