उन्हाचा कडाका वाढत असल्याने आणि दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिली असून सोमवार, 21 मार्चपासून जिल्ह्यातील या सर्व शाळा व खाजगी प्राथमिक शाळा या सकाळच्या सत्रात सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी दुपारच्या आत घरात असतील.
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही
जिल्ह्यात झेडपीच्या 2 हजार 583 शाळा आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळा खूपच विलंबाने सुरू झाल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या, परंतु आता उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होणार नाही, त्यांची गैरहजेरी वाढणार नाही, याची खबरदारी घेऊन आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (जिल्हा परिषद) सकाळच्या सत्रात भरविली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग यांनी नुकतेच आदेश काढले आहेत, तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सकाळी साडेदहा वाजताच सुरू होणार असल्याने पाचवी ते नववीच्या मुलांच्या शाळांबाबत ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा महापालिका मुख्यालयातील ‘तो’ अपमान कोणाच्या लागला जिव्हारी?)
Join Our WhatsApp Community