एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीच निर्णयांचा पाऊस पडत असताना, मुंबईकरांची वाढत्या उष्णतेपासून सुटका करण्यासाठी वरुणराजाने दि. १० ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. सकाळापासून शांत असलेल्या पावसाने दि. १० ऑक्टोबरला सकाळी जोरदार हजेरी लावली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या आजूबाजूच्या परिसरात विजेच्या कडकडात ढगांच्या गडगडासह तुफान पाऊस झाला. (Heavy Rain)
( हेही वाचा : Crime : समलैंगिक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला पवईतून अटक)
दरम्यान दादर पूर्व परिसरात विजेच्या गडगडात झालेल्या पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणी तुंबलेले होते. राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कसमोरील शिवतीर्थाशेजारी ही गुडघ्याभर पाणी साजले होते. तर दादरवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या पटऱ्यांवर ही पाणी साचल्याचे आढळले. (Heavy Rain)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community