पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच असल्याचे पहायला मिळते, तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा (Monsoon) अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येते. पुण्याच्या कोथरूड, हडपसर, विद्यापीठ, विमाननगर भागात ढगाळ वातावरण तयार होऊन हळूहळू पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.
‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी
पुणे शहरातील बिबवेवाडी, अप्पर, मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी चांगला पाऊस (Monsoon) झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याचे देखील दिसून आले. काही वेळ नागरिकांना अडचणींचा सामना देखील करावा लागला. मुंबई, रायगड, जालना, औरंगाबाद, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा (Monsoon) हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.
Join Our WhatsApp Community