Heavy Rain : मध्य रेल्वेची सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत तर मुंबई-पुणे दरम्यान १० रेल्वे रद्द

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित

245
Heavy Rain : मध्य रेल्वेची सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत तर मुंबई-पुणे दरम्यान १० रेल्वे रद्द

आज (१९ जुलै) पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे केवळ डोंबिवलीपर्यंतच मध्य रेल्वेची सेवा सुरु आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्वतः ही माहिती दिली आहे. तसेच मुंबई-पुणे दरम्यान देखील १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई – पुणे दरम्यानच्या ‘या’ ट्रेन रद्द

12123 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – डेक्कन क्वीन (१९ जुलै)
12124 – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – डेक्कन क्वीन (२० जुलै)
11009 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – सिंहगड एक्स्प्रेस (१९ जुलै)
11010 – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सिंहगड एक्स्प्रेस (२० जुलै)
11008 – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – डेक्कन एक्स्प्रेस (१९ जुलै)
11007 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – डेक्कन एक्स्प्रेस (२० जुलै)
12128 – पुणे – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (१९ जुलै)
12127 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (२० जुलै)
22106 – पुणे – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (१९ जुलै)
22105 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (२० जुलै)

(हेही वाचा – Heavy Rain : मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प तर रस्ते वाहतूक विस्कळीत)

कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने (Heavy Rain) जनजीवन विस्कळित झाले असून कल्याण मधील रामबाग, बेतुरगड पाडा, वालधुनी, कोळसेवाडी, आढवली- ढोकली, काकांचा ढाबा, चिंचपाड सह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही दुकानात व घरातही पाणी शिरले आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.

या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

अशातच हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट (Heavy Rain) देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या आनंदात भर पडली आहे. खूप दिवसांपासून रखडलेली पेरणी पुन्हा एकदा या पावसामुळे शक्य झाली आहे.

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून रायगड जिल्ह्यातील चार नद्या इशारा पातळी वर वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील वशिष्ठी नदीचे पाणी काही सखल भागामध्ये शिरले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.