सावधान! आज ढगफुटी, अतिवृष्टी! 

शनिवारी एका बाजूला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असताना दुसरीकडे मात्र नेमके आजच समुद्राला भरती आहे. त्यामुळे साहजिकच मिठी नदीने पहाटेपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे धोक्याची पातळी गाठली आहे.

139

यंदाच्या मान्सूनच्या पहिल्या दिवशीच पावसाने अक्षरशः मुंबईकरांचा घामटा काढला होता. पावसाने अक्षरशः २०-२० सुरु केली आहे. शनिवारी, १२ जून रोजी तर हवामान खात्याने ढगफुटीचा इशारा दिला आहे. ही ढगफुटी तळ कोकणात होणार असली, तरी मुंबई आणि महामुंबई परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असले, तरी मुंबईकरांनो, घरीच बसा!, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

मुंबई आणि उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)

भरतीमुळे अडचणी वाढणार! 

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, या म्हणीप्रमाणे शनिवारी एका बाजूला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असताना दुसरीकडे मात्र नेमके आजच समुद्राला भरती आहे. त्यामुळे साहजिकच मिठी नदीने पहाटेपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे धोक्याची पातळी गाठली आहे. आता पावसाचा जोर वाढल्यास मुंबईकरांची पर्यायाने महापालिका प्रशासनाची तारांबळ उडणारा आहे.

महापालिका सज्ज! 

दरम्यान मुंबईत पाऊस आणि पाणी तुंबणे हे आता समीकरणच बनले आहे. त्यामुळे आजही पावसाचे पाणी जमा होणार हे गृहीत धरूनच महापालिकेने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्हावा याकरता बसवण्यात आलेले पंप सुरु आहेत का, याची चाचपणी करण्यात आलेली आहे.

हवामान खात्याचा इशारा! 

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा

हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसे घडल्यास तौक्ते चक्रीवादळानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवे संकट ठरेल. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग परिसरात आपातकालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.

(हेही वाचा : १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.