राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्टमध्ये पावसाची तीव्रता कमी झाली होती, पण सप्टेंबरच्या सुरुवातीस पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असताना पावसामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू)
हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांच्या मते, येत्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा प्रभाव राहील. पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Heavy Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community