सलग तीन दिवस मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. अशातच दुपारनंतर मुंबईतल्या पावसाने जोर धरला. त्यामुळे अनेक सखल भाग हे जलमय झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.
(हेही वाचा – Heavy Rain : हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द लोकल बंद; मध्य रेल्वेही विस्कळीत)
अंधेरी सबवे प्रमाणे किंग सर्कल परिसरात देखील पाणी साचले आहे. तर वेस्टर्न एक्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
रस्ते वाहतुकीप्रमाणेच रेल्वे वाहतुकीवर देखील आजच्या पावसाचा परिणाम झाला आहे. कुर्ला स्टेशनवर पाणी साचल्याने हार्बर आणि मध्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढेही असाच पाऊस झाला तर परिस्थिती जास्त बिघडू शकते. याच पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community