गेल्या दोन – तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस म्हणजेच जुलै २१ पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक काहीशी धीमी झाली आहे.
‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
अशातच हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या आनंदात भर पडली आहे. खूप दिवसांपासून रखडलेली पेरणी पुन्हा एकदा या पावसामुळे शक्य झाली आहे.
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून रायगड जिल्ह्यातील चार नद्या इशारा पातळी वर वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील वशिष्ठी नदीचे पाणी काही सखल भागामध्ये शिरले आहे.
तसेच पुण्यातील लोणावळ्यात गेल्या २४ तासांत इथं तब्बल २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर ४८ तासांत तब्बल ४३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Monsoon rains recorded so far in some cities of Maharashtra, from 1st June to 16th July:#Mahabaleshwar 1504mm#Mumbai 1160mm#Ratnagiri 949mm#Brahmapuri 531mm#Kolhapur 176mm#Nashik 133mm#Pune 131mm#MumbaiRains #Monsoon
— MumbaiWeatherUpdate (@mumbaiweatheru1) July 16, 2023
(हेही वाचा – Drugs : अमली पदार्थविरोधात सरकार आक्रमक; सर्व पोलिस ठाण्यात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष)
मुंबईला आज ऑरेंज अलर्ट
आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसांसाठी १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
खानदेशातही खानदेशातही कमीअधिक पाऊस
गेल्या दोन दिवसांत खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community