Heavy Rain In Goa: गोव्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

158
Heavy Rain In Goa: गोव्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
Heavy Rain In Goa: गोव्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गोव्यात (Heavy Rain  Goa) मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी मुसळधार पावसामुळे येथील सर्व रस्ते ओसंडून वाहत असून सर्वत्र पाणी तुंबले आहे. तर काही ठिकाणी वीज ही खंडित झाली आहे. तसेच गुरुवारी एक दिवस पावसाने विश्रांनी घेतली पण शुक्रवार पासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. (Heavy Rain In Goa)

गोव्याला मागील रविवार सोमवारपासून पावसाने झोडपून काढले होते. नंतर दाेन दिवस ओसरला पण शुक्रवार सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला. त्यामुळे राज्यातील रस्त्यावर पाणी तुंबले होते. मुसळधार पडत असलेल्या पावसाने अनेक  ठिकाणी झाडे पडली त्यामुळे लाेकांना याचा फटका बसला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही साफसफाईची कामे करण्यात येत आहे. (Heavy Rain In Goa)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह; बांसुरी स्वराज यांचा आरोप)

 राज्यात ऑरेंज अलर्ट

राज्यात शुक्रवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून १४ जुलै पर्यंत ऑरेज अलर्ट (Orange Alert Goa) जारी केला आहे. तर १५ व १६ जुलै रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे राज्यात पुढील पाच दिवस जाेरदार पावसाची शक्यता असून वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छिमाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचा  इशारा राज्य हवामान खात्याने दिला आहे.  (Heavy Rain In Goa)

(हेही वाचा – भाजप MP Kangana Ranaut यांना भेटण्यासाठी द्यावे लागणार आधार कार्ड; काय म्हणाली अभिनेत्री…

 नदी धरणांची पातळी वाढली 

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे. तर साळावली धरण भरले आहे तर अंजूने धरणही ६० (Anjune Dam) टक्के भरले आहे. आसपासचे इतर धरण ही भरली आहेत. तसेच नद्यांच्या शेजारील गावांना आपत्कालीन व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात ५ जणांचा मुसळधार पावसाने बळी घेतला होता. तसेच अनेक गुरेही वाहून गेली. (Heavy Rain In Goa)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.