Heavy Rain in Konkan : २७ गावांचा संपर्क तुटला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

437

तळ कोकणात पावसाची (Heavy Rain in Konkan) दमदार हजेरी लागली आहे. यामुळे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाबरोबर शहरी भागांमध्ये देखील फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल या ठिकाणी हायवे लगत असलेला डोंगर कोसळून महामार्ग ठप्प झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने धोकमवाडी, कसाल येथील अर्धवट खोदून ठेवलेला डोंगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळला. त्यानंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. खचलेला डोंगर आणि निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी मुख्य रस्त्यावर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओरोस येथे पाणी आल्याने महामार्ग ठप्प देखील झाला होता. गेल्या अर्ध्या तासापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ओरोस येथे पाणी आल्यामुळे महामार्ग ठप्प होता.

(हेही वाचा Muslim : धर्मांध अदनानकडून हिंदू विद्यार्थिनीचा छळ; कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण; कुटुंबिय घर सोडून गेले)

कसाल कोलते हॉस्पिटल या ठिकाणी चार घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे. यात चार घरांपैकी तीन घरातील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती (Heavy Rain in Konkan) निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे सावंतवाडी शहरांमध्ये पावसाची सकाळपासून संततदार सुरू आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने सावंतवाडी शहरांमध्ये पाणी साचलेले पहायला मिळाले. शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले.

काही दुचाकी देखील पाण्यात अडकल्या होत्या. परिसरातील दुकानात पाणी शिरू लागले होते. सहसा कधीही न तुंबणारी सावंतवाडी पाण्यात गेल्याने सावंतवाडीची तुंबावाडी बनली होती. दिवसभर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Konkan)  सावंतवाडी तालुक्यातील नरेंद्र डोंगर वनविभागाच्या चौकीवर झाड पडून कर्मचारी गंभीरित्या जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. वन खात्याच्या चौकीवर माजी सैनिक विद्याधर सावंत हे ड्युटीवर कार्यरत होते. त्यात चौकीवर हे झाड पडून सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.