Heavy Rain: मराठवाडा, विदर्भाला पुराचा फटका! १२ जणांचा मृत्यू, पिके वाहून गेली, जनावरे दगावली

132
Heavy Rain: मराठवाडा, विदर्भाला पुराचा फटका! १२ जणांचा मृत्यू, पिके वाहून गेली, जनावरे दगावली
Heavy Rain: मराठवाडा, विदर्भाला पुराचा फटका! १२ जणांचा मृत्यू, पिके वाहून गेली, जनावरे दगावली

विदर्भ (Vidarbha), मराठवड्याला (Marathwada) पावसाने (Heavy Rain) चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, चंद्रपूर आदि जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने आगमन केले आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहे. तर शेती देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा-National Crime Records Bureau Report: अत्याचाराच्या घटनेत ‘युपी’ पहिल्या क्रमांकावर तर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?)

नांदेड (Nanded) जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं असून अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. जिल्ह्यतील 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नांदेडमधील आसना नदीला पूर आला असून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Heavy Rain)

(हेही वाचा-BoycottNetflix का होतंय ट्रेंड? ‘Netflix’ला केंद्र सरकारची नोटीस! काय आहे कारण?)

हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्ण उघडले आहेत, धरणातून 97 हजार 046क्युसेक ने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे कार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. (Heavy Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.