Rain in Mumbai : मुंबईत पावसाचा पॉवर प्ले; विमानतळाचा रन-वे बंद, मेट्रो ठप्प

मुंबई उपनगरांत वादळी वाऱ्यांमुळे (Rain in Mumbai)  काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

423
Rain Alert: पुण्यात मुसळधार, तर सिंधुदुर्गात रेड अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा? जाणून घ्या..
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी, १३ मे रोजी संध्याकाळी ३ वाजल्यापासून अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Rain in Mumbai) पडत आहे. मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा सुटला आहे. हवामान खात्यानं पुढील दोन ते तीन तासांता वादाळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावर झाला आहे. मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबई मेट्रो सेवाही ठप्प झाली.

पुढील तीन तासांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

मुंबई उपनगरांत वादळी वाऱ्यांमुळे (Rain in Mumbai) काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलुंड, भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील तीन तासांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून उंच झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई मेट्रो-१ सेवा ठप्पवादळी वारे आणि पावसाचा फटका घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवेलाही बसला आहे. मेट्रो लाइनच्या ट्रॅकवर बॅनर पडल्यामुळे मेट्रो सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.