मुंबईत पावसाचा हाहाकार! मध्य रेल्वे ठप्प; प्रवाशांची गैरसोय

मुंबईसह ठाणे, डोंबिंवली, कल्याण आणि नवी मुंबईत बुधवार सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरी निघालेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेती वाहतूक विस्कळीक झाल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबईत 72 मिमीहून अधिक पाऊस; ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार )

मुंब्र्यात ढगफुटीसदृश्यस्थिती

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून ठाण्यापासून पुढे कळवा ते कल्याणपर्यंत रेल्वे ठप्प झाली आहे. याशिवाय मुंब्र्यात सुद्धा ढगफुटीसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या प्रवाहासारखे पाणी रस्त्यांवर वाहत आहे.

याचा सर्वात मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबईतील भांडूप संकुलात 72.89 मिमी पाऊस झाला तर ऐरोलीत 79.1 मिमी, ऐरोलीगावात 81.7 मिमी, ठाण्यातील कोपरी येथे 93.6 मिमी तर नौपाड्यात चक्क 96.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 7 दरम्यान हा पाऊस झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here