मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवार सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये 0.5 फूटापर्यंत पाणी साचल्याने, वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. सकाळपासून होणा-या दमदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
पावसाळ्यात अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी साचण्याची ही काही नवीन समस्या नाही. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे बंद करण्याची वेळ येते. याच समस्येवर पालिकेने तोडगा काढण्यासाठी BMC ने अंधेरी पश्चिमेतील नाल्यांचे रुंदीकरण करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेतला. जो पूर्ण होण्यासाठी 18 महिने लागणार आहेत. 2005 मध्ये आलेल्या पुरानंतर, पूर टाळण्यासाठी पालिकेने आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधले. त्यानुसार मोगरा नाल्याच्या पंपिंग स्टेशनमुळे पावसाळ्यात पाणी तुंबणा-या अंधरी, वर्सोवा, जोगेश्वरी आणि ओशिवारासारख्या भागाला दिलासा मिळाला असता, परंतु अजूनही त्याची योग्य ती अंमलबजावणी झालेली नाही.
( हेही वाचा: भाजप आमदाराच्या PA चे FB अकाऊंट हॅक; आमदाराविरोधात टाकली पोस्ट, तक्रार दाखल )
Join Our WhatsApp Community