मुंबईत हवामान खात्याने बुधवार, २६ जुलै रोजी रात्रीपासून गुरुवार, २७ जुलै दुपारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार गुरुवारी मुंबईत सकाळपासून पाऊस कोसळत आहे, शहरात सततच्या पावसामुळे अखेर मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक मंदावली. पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला.
जोराच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने लोकांची गैरसोय झाली. हवामान खात्याने आधीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने शहर आणि उपनगरातील शाळा-महाविस्यालयाना सुटी जाहीर केली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नाही. मात्र चाकरमान्यांना या पावसाचा फटका बसला. दुपारच्या वेळी जोराच्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची दुपारपासून गर्दी झाली. पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या मंद गतीने धावत होत्या.
(हेही वाचा Heavy Rain : मुंबईसाठी पुढील १२ तास महत्वाचे; पुन्हा रेड अलर्ट)
Join Our WhatsApp Community