पुण्यात पावसाचे धुमशान! 2 तासांत रस्ते पाण्याखाली

पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आता पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

101

यंदाचा मान्सून ३० सप्टेंबर रोजी संपला तरी तो राज्यासह देशात कुठे ना कुठे कोसळत आहे. शनिवारी पावसाने पुण्याला झोडपून काढले. पुण्याच्या पूर्व भागात 2 तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. विशेषत: धानोरी येथे सखल भागात पाणी साचले, तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड येथे वृक्ष उन्मळून पडले.

धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी

पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आता पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी आले. पुणे शहरात पावसामुळे बरसल्यामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, म.हौ. बोर्ड येथे पाणी साचले. तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच पिसोळी ग्रामपंचायतजवळ वीज पडून आग लागल्याचा प्रकार समोर आला. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवली.

(हेही वाचा : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज! रोज १००० जादा गाड्या सोडणार)

नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस

पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या भागात विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.