रात्रभर कोसळलेल्या पावसामुमुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सकाळी अकरापर्यंत मुंबईत पावसाचा मात्र सुरु होता. राज्यात दक्षिण कोकण आणि यवतमाळ जिल्ह्यात नद्यांना पूर आला. शनिवार, २२ जुलै रोजी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रायगड जिल्यासाठी तीन दिवसांपासून दिलेला रेड अलर्ट मागे घेतला. शनिवारी रायगडसह दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या भागात २०० मिमीपर्यंत पाऊस होईल. पालघर, ठाणे आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून २०० मिमी पेक्षाही जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ जुलैपर्यंत कर्नाटक ते गुजरात राज्यापर्यंतच्या खोल समुद्रात ताशी ४० ते ४५ पासून ६५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने या भागातील खोल समुद्रात जाऊ नका, असे आवाहन भारतीय वेधशाळेने केले आहे.
(हेही वाचा – दादरच्या गोलदेऊळाला खड्डयांचा विळखा : रिऍक्टीव्ह अस्फाल्टही फेल?)
शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत बेफाम पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या नोंदीत मुंबईत विविध ठिकाणी १०० मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे २०० मिमीपर्यंत पाऊस झाला. कुलाबा येथे १०३ मिमी, राम मंदिर येथे १२७ मिमी, वांद्रे येथे १६०.५ मिमी, विद्याविहार येथे १८६ मिमी पावसाची नोंद झाली.शनिवारी सकाळी अकरापर्यंत धो धो कोसळल्यानंतर मुंबईत पावसाने ब्रेक घेतला. सायंकाळी उशिरा पुन्हा एक मोठी सर येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community