Heavy Rain : राज्यात आज मुसळधार, हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा

557
Heavy Rain : राज्यात आज मुसळधार, हवामान खात्याने दिला इशारा
Heavy Rain : राज्यात आज मुसळधार, हवामान खात्याने दिला इशारा

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाऊस झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात या पावसाचा शेती पिकांना मोठा फटकाही बसला आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या भागात मुसळधारेची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मनोरा आमदार निवासाचे ३ ऑगस्टला भूमिपूजन; चार वर्षांनी मिळाला मुहूर्त)

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

काही भागात चांगला पाऊस पडल्याने तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.