Heavy Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट; रायगड, रत्नागिरीतील सर्व शाळांना सुट्टी

206
Heavy Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट; रायगड, रत्नागिरीतील सर्व शाळांना सुट्टी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आज (बुधवार, २६ जुलै) कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार झाल्याने आज (बुधवार २६ जुलै) राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) अधिक वाढणार आहे. पुढचे ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि खेडमध्ये रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

(हेही वाचा – तानसा धरण आणि विहार तलावही भरले, मुंबई महापालिकेची आता खरी कसोटी)

पावसाचा वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईच्या अंधेरी सबवेत पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

‘या’ राज्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत काल रात्रीपासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे आणि यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाण्यासह मुंबईत आज ऑरेंज अलर्ट कायम आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.