Rain Update : राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस, येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा

227
Rain Update : राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस, येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा
Rain Update : राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस, येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईत दोन आठवड्यानंतर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच नाशिकमध्येही जोरदार पाऊस पडत असल्याने उकाड्यापासून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

मुससळधार पावसामुळे शासकीय यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं होतं. पाऊस न पडल्याने पिके करपली. आज अनेक ठिकाणी पाऊस बरसला. त्यानंतर आता हवामान खात्याने पुढील 48 तासांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबई ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईत 9 सप्टेंबर रोजी मध्यम, तर 10 सप्टेंबरला वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Bhopal Gas Tragedy : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात असताना अमेरिकेत उपस्थित झाला भोपाळ गॅस दुर्घटनेचा मुद्दा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.