नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार (Heavy Rain) हार्बर रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द दरम्यान रेल्वे ठप्प झाली आहे. तसेच मध्य रेल्वेवरील लोकल सेवा देखील १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहेत.
(हेही वाचा – Heavy Rain : कोकणापाठोपाठ मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भातही ‘रेड अलर्ट’)
शुक्रवार २१ जुलै रोजी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत मुसळधार (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली आहे. याचाच परिणाम वाहतुकीवर झाला आहे. रस्ते वाहतूक धीम्या गतीने कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द लोकल सेवा ठप्प झाली आहे.
Visuals of Water Logging at Kurla Station on @Central_Railway Harbour Line#MumbaiRains https://t.co/SlfXXtGQb1 pic.twitter.com/aiCrbIDfiS
— मुंबई Matters™✳️ (@mumbaimatterz) July 21, 2023
हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर डाऊन हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा लोकल सेवा सुरू आहे. तसेच, डाऊन हार्बर मार्गावरील मानखुर्द ते पनवेल लोकल सेवा देखील सुरू आहे. दरम्यान, पावसामुळे (Heavy Rain) मध्य रेल्वेवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community