आता रायगड जिल्ह्यात पावसाचा लॉकडाऊन! 

रायगड जिल्ह्यात 10 व 11 जून हे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहेत.

रायगड किल्ल्याभोवती पावसाळी ढगांचा विळखा 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या अधिक होती, अजूनही जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने राज्यात अनलॉक सुरु केला, तरी रायगड जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे, त्यामुळे जिल्ह्यात अजूनही निर्बंध कडक आहेत. मात्र अनलॉक प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांबरोबर आणि सर्वसामान्य वस्तूंच्या दुकानांना, मैदाने, वाहतूक यांना सवलत देण्यात आली होती. परंतु आता हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे १०, ११ जून हे दोन दिवस जिह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे हे दोन दिवस पुन्हा कडक लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे, यावेळी मात्र पाऊस हे कारण आहे.

(हेही वाचा : वेबसीरिजच्या नावाखाली मुंबईत देहव्यापार)

कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई!

रायगड जिल्ह्यात 10 व 11 जून हे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अतिवृष्टीच्या कालावधीत होणारी जीवित व आर्थिक हानी टाळण्यासाठी 10 जून व 11 जूनला सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त दवाखाने, रुग्णालय, मेडिकल, पॅथॉलॉजी सुरु राहतील. तसेच सर्व शासकीय कार्यालयेही या कालावधीत सुरु राहतील, असे जिल्हाधिकार्यांच्या आदेशात म्हटले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई! 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर शासनाने यापूर्वी लागू केलेल्या दंडात्मक कारवाईस, तसेच भादंवि कलम १८८, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१सह अन्य तरतुदीसह शिक्षेस पात्र ठरतील, असे या आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here