Weather Update : देशातील ‘या’ सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

124
Weather Update : देशातील 'या' सहा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशातील सहा राज्यांना आज म्हणजेच शनिवार २५ नोव्हेंबर रोजी (Weather Update) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यानुसार पुढील 24 तासांत तामिळनाडू, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल असे (Weather Update) हवामान खात्याने (आयएमडी) म्हंटले आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : ‘सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलीय’, अजित पवारांची भुजबळांना तंबी ? राजकीय चर्चांना उधाण)

तामिळनाडूच्या अनेक भागात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर तामिळनाडूमध्ये (Weather Update) शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मुंबई आणि दिल्लीत हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तर महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पर्वतीय भागातील (Weather Update) बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढेल. यासोबतच तामिळनाडू आणि केरळ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.