काल पासून म्हणजेच मंगळवार ४ जुलै पासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. याचा काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेवाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरु आहे. अशातच येत्या तीन ते चार दिवसांत म्हणजेच ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झालं आहे. त्यामुळं सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.
कुठे कुठे पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात ५ आणि ६ जुलैला, गुजरातमध्ये ७ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओडिशा राज्यात ६ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
(हेही वाचा – महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतन धारकांचे ‘फॉर्म – १६’ तयार)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
आज म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community