राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार
21 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
आज, राज्यात पावसाचे इशारे नाहीत ⛅
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे,उद्यापासून राज्यात 20 -23 Sept दरम्यान काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत 🌩तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची🌧 शक्यता.
– IMD pic.twitter.com/cQQLJbEAID— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 19, 2021
नागरिकांना आवाहन
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस म्हणजेच 23 सप्टेंबरपर्यंत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, गोंदिया (यलो अलर्ट)
22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)
Join Our WhatsApp Community२१ Sept, उपग्रह छायाचित्र, ९.१५ सकाळी
पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, विदर्भ…कडे लक्ष असू द्या. 🌧🌧
काही ठिकाणी लो/मीडियम ढग दिसत आहेत.☔
मुंबई ढगाळ वातावरण.🌧🌧 pic.twitter.com/KFJ8lPjuNb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 21, 2021