वाढत्या पावसाच्या जोरासह मुंबईत गुरुवारी सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत ताशी ४० ते ५० वेगाने वारे वाहतील, मुंबईतील बहुतांश ठिकाणी दर तासाला तीस मिलीमीटर पाऊस होईल, काही ठिकाणी सलग तिस-या दिवशी मुंबईत २०४.५ मिलीमीटर पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या १२ तासांत मुंबईतील बहुतांश भागांत रात्री पुन्हा पावसाची संततधार सुरु राहिली. मागच्या बारा तासांत १०० मिमीच्या जवळपासच पाऊस झाला. मंगळवार आणि बुधवारच्या तुलनेत फारसा पाऊस झाला नाही. संपूर्ण चोवीस तासांत सकाळी साडेआठच्या नोंदीत कुलाब्यात ११०.६ मिमी, सांताक्रूझ येथे १२५ मिमी पाऊस झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. त्यापैकी गेल्या चोवीस तासांत कुलाबा येथे ८० मिमी पाऊस झाला. मध्य मुंबईतील चेंबूर ते विद्याविहारदरम्यान केवळ ४० मिमीपर्यंत पाऊस झाला. दक्षिण मुंबईत केवळ २० ते ३० मिमी दरम्यान पाऊस झाला. नरिमन पाॅईंट येथे ५६.८९ मिमी, पालिका मुख्य कार्यालय परिसरात ६९.१ मिमी पाऊस झाला. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेला लागून असलेल्या परिसरात पावसाचा जोर जास्त होता. मरोळ येथे १०८.६ मिमी, मुंबई विमानतळ येथे ६२.५ मिमी, जोगेश्वरी परिसरात ९७,५१ मिमी, अंधेरीत ८०.४९ मिमी, मुलुंड येथे ७६.८६, बोरिवली पश्चिमेला ७१.०९ मिमी पाऊस झाला.
Join Our WhatsApp Community