जोरदार पावसामुळे घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळल्याची घटना

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवार संध्याकाळपासून कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली आहे. शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. तर लोकल गाड्यांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबई आणि ठाण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पाच ठिकाणी घरांची पडझड झाली. तर जोरदार पावसामुळे घाटकोपरमध्ये घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. पंचशील नगरमध्ये ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घरातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढले.

( हेही वाचा: मुंबईतील पावसाचा लोकल सेवेला फटका; तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक धीम्या गतीने )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here